‘बिग बॉस मराठी’मध्ये जाणार का? गौतमी पाटीलने दोन शब्दात दिलं उत्तर
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा सहावा आठवडा सुरू आहे. पाचव्या आठवड्यात सदस्यांच्या जोड्या बनवल्या होत्या, ज्यामुळे वाद झाले. सहाव्या आठवड्याच्या सुरुवातीलाच नॉमिनेशन टास्कमध्ये सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. अशातच दुसऱ्या बाजूला वाइल्ड कार्ड एन्ट्रीची चर्चा असून, गौतमी पाटीलचं नाव घेतलं जात आहे. पण खरंच गौतमी 'बिग बॉस मराठी'च्या घरात जाणार की नाही? याबाबत तिने स्वतः खुलासा केला आहे.