‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘चला हवा येऊ द्या’मधील कलाकारांची अचानक भेट, पाहा फोटो
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि 'चला हवा येऊ द्या' हे मराठीतील दोन लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मागील सहा वर्षांपासून प्रेक्षकांना हसवत आहे, तर 'चला हवा येऊ द्या'ने १० वर्ष मनोरंजन केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. नुकतंच या दोन्ही कार्यक्रमातील कलाकारांची अचानक भेट झाली. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रसाद खांडेकरने हा फोटो शेअर करत लवकरच पुन्हा भेटण्याचे आश्वासन दिले आहे.