अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतला झाली मुलगी, नामकरण सोहळ्याचे खास क्षण आले समोर
Sharmishtha Raut Desai Blessed With Baby Girl : सध्या अभिनयासह निर्मितीची धुरा उत्कृष्टरित्या सांभाळणाऱ्या शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला आहे. शर्मिष्ठा आई झाली असून तिनं गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्रीच्या मुलीच्या नामकरण सोहळ्यातील खास क्षण ‘राजश्री मराठी’च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये आई-बाबा झाल्यामुळे शर्मिष्ठा राऊत आणि नवरा तेजस देसाई खूप आनंदी दिसत आहेत.