“आमचा छोटा सुपरहिरो आला…”, मायरा झाली ताई; श्वेता वायकुळ यांनी गोंडस मुलाला दिला जन्म
'झी मराठी'वरील 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून प्रसिद्ध झालेली बालकलाकार मायरा वायकुळ आता मोठी ताई झाली आहे. तिच्या आईने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. मायरा वायकुळने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.