‘फुलवंती’ चित्रपटातील कलाकार ‘बिग बॉस मराठी’च्या घरात; सदस्यांबरोबर केली धमाल-मस्ती
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात रितेश देशमुख कामानिमित्ताने परदेशात असल्यामुळे सलग दुसऱ्या आठवड्यात 'भाऊचा धक्क्या'वर गैरहजर आहे. ६ ऑक्टोबरला होणाऱ्या महाअंतिम सोहळ्याला तो उपस्थित राहणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत खास पाहुण्यांनी घरात हजेरी लावली. आज 'फुलवंती' चित्रपटाची टीम 'बिग बॉस'च्या घरात पाहायला मिळणार आहे. यावेळी गश्मीर महाजनी आणि प्राजक्ता माळी सदस्यांबरोबर धमाल-मस्ती करताना दिसणार आहेत.