वंदना गुप्ते यांनी संकर्षण कऱ्हाडे व तन्वी मुंडलेला दिली ‘ही’ खास वस्तू, अभिनेता म्हणाला…
ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते सध्या खूप चर्चेत आहेत. एकाबाजूला त्यांच्या 'अशी ही जमवा जमवी' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचं कौतुक होतं आहे. या चित्रपटात वंदना गुप्तेंसह अशोक सराफ झळकले आहेत. तर दुसऱ्याबाजूला वंदना गुप्ते यांचं 'कुटुंब किर्रतन' नाटक रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. या नाटकात वंदना गुप्तेंसह संकर्षण कऱ्हाडे व तन्वी मुंडले प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. अशातच वंदना यांनी संकर्षण व तन्वीला खास वस्तू दिली. यासंदर्भात संकर्षणने नुकतीच पोस्ट शेअर केली आहे.