आर्थिक विवंचना, आजारपण अन् मुलाने सोडली साथ; ज्येष्ठ अभिनेत्रीचं निधन
दाक्षिणात्य अभिनेत्री बिंदू घोष यांचे ७६ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी तेलुगू व तमिळ चित्रपटांमध्ये विनोदी भूमिकांसाठी ओळख मिळवली होती. बिंदू घोष मागील काही वर्षांपासून आजारी होत्या आणि आर्थिक अडचणींनी त्रस्त होत्या. त्यांच्या मुलांनी निधनाची पुष्टी केली आहे. बिंदू यांनी १९६० साली कमल हासनसोबत अभिनयात पदार्पण केले होते. तमिळ कलाकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.