अल्लू अर्जुनला जामीन मिळूनही तुरुंगात का राहावं लागलं? वकिलांची टीका अन्.. नेमकं काय घडलं?
अभिनेता अल्लू अर्जुनला 'पुष्पा 2'च्या प्रीमियरदरम्यान चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आली. तेलंगणा हायकोर्टाने जामीन मंजूर केला, परंतु जामिनाची प्रत उशिरा मिळाल्यामुळे त्याला एक रात्र तुरुंगात राहावं लागलं. शनिवारी सकाळी त्याची सुटका झाली. तुरुंग प्रशासनाने जामिनाच्या प्रतीची तपासणी केल्यावरच सुटका केली. अल्लू अर्जुनने घडलेल्या घटनेवर दु:ख व्यक्त करत तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.