कलाकार नाही, दिग्दर्शक नाही अन् काहीच नाही! फक्त १० लाखांत पुजाऱ्याने ‘असा’ बनवला चित्रपट
चित्रपट निर्मितीमध्ये कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार यांची आवश्यकता असते. मात्र, नरसिम्हा मूर्ती आणि एआय एक्सपर्ट नूतन यांनी फक्त १० लाख रुपये खर्चून 'लव्ह यू' हा कन्नड चित्रपट तयार केला आहे. एआयच्या मदतीने त्यांनी कलाकार, साउंडट्रॅक आणि व्हिज्युअल तयार केले. ९५ मिनिटांच्या या चित्रपटात १२ गाणी आहेत. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या इनोव्हेशनचे कौतुक केले आहे.