‘२२ मराठा बटालियन- गोष्ट गनिमी काव्याची’मध्ये मराठी कलाकारांची मांदियाळी!
मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक कथानकांनी प्रेक्षकांच्या मनात नेहमीच खास स्थान मिळवलं आहे. त्याच परंपरेला पुढे नेणारा ‘२२ मराठा बटालियन- गोष्ट गनिमी काव्याची’ हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा तंत्राचे विविध पैलू या चित्रपटात दाखवले जातील. दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार यांच्या नेतृत्वाखाली, प्रवीण तरडे, प्रसाद ओक यांसारख्या तगड्या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होईल.