“अबू आझमी नावाच्या गृहस्थाने…”, शरद पोंक्षे भडकले; म्हणाले, “हो औरंगजेब खूप चांगला…”
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता, असे विधान केले आहे. त्यांच्या विधानावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी अबू आझमींच्या विधानावर टीका करताना औरंगजेबाने मंदिरं उद्ध्वस्त केली, हिंदू मूर्तींची तोडफोड केली, आणि हजारो बायकांवर अत्याचार केले, असे सांगितले. त्यांनी अबू आझमींच्या विधानाला विरोध दर्शवला आहे.