“डोळ्यामध्ये अंजन घालणारा…”, अवधूतचं सचिन पिळगांवकरांच्या ‘या’ चित्रपटाबाबत वक्तव्य
जगभर प्रवास करून अनेक पुरस्कार विजेता आणि प्रेक्षकांची मनं जिंकणारा ‘स्थळ’ चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. सचिन पिळगांवकर प्रस्तुत आणि जयंत सोमलकर लिखित-दिग्दर्शित ‘स्थळ’ चित्रपटात अभिनेत्री नंदिनी चिकटे प्रमुख भूमिकेत झळकली आहे. नुकतंच या चित्रपटाच स्क्रीनिंग पार पडलं. या स्क्रीनिंगला अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. त्यामुळे सध्या कलाकार सोशल मीडियाद्वारे ‘स्थळ’ चित्रपटाचं भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.