“एकटा पडलो…”, महेश मांजरेकर-रेणुका शहाणे मुख्य भूमिकेत; ‘देवमाणूस’चा ट्रेलर प्रदर्शित
'देवमाणूस' या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ट्रेलरमध्ये रहस्यपूर्ण आणि गूढ कथानकाची झलक आहे. निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार कथा सादर करण्याचा संकल्प केला आहे. 'देवमाणूस' २५ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.