elizabeth ekadashi fame sayali bhandakavathekar 10 to 12 retake for this scene
1 / 30

‘बांगड्या गरम, बांगड्या गरम’चा सीन करण्यासाठी झेंडूने घेतले होते ‘इतके’ रिटेक

‘एलिझाबेथ एकादशी’मधील एक सीन खूप गाजला होता. ज्यामध्ये झेंडू बांगड्या विकताना पाहायला मिळाली होती. यावेळी गिऱ्हाईकांना आपल्या दुकानाकडे वळवण्यासाठी तिची आणि चहावाल्याची झालेली जुगलबंदी अजूनही प्रेक्षकांना खूप आवडते. ‘बांगड्या गरम, बांगड्या गरम…गरम बांगड्या, गरम बांगड्या’ हा झेंडूचा डायलॉग अजूनही प्रेक्षकांना खूप हसवतो. या सीनचे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. पण हा सीन करताना किती रिटेक घ्यावे लागले? हे तुम्हाला माहितीये का?

Swipe up for next shorts
Success story of Dr kamini singh left government job for moringa business now earning near 2 crore
2 / 30

सरकारी नोकरी सोडली अन् धरली ‘ही’ वाट, आता करतात कोटींची कमाई; नेमकं काय करते ‘ही’ व्यक्ती

शिक्षण पूर्ण करून सरकारी नोकरी मिळवण्याचे बहुतेक लोकांचे स्वप्न असते, तर काही लोक आउट ऑफ द बॉक्स विचार करतात. डॉक्टर कामिनी सिंग यांनीही असेच काहीसे केले. चांगली कमाई करणाऱ्या कामिनीने व्यवसायासाठी सरकारी नोकरी सोडली. मात्र, त्यांचा निर्णय अगदी योग्य होता. आज त्यांची वार्षिक उलाढाल दोन कोटींच्या आसपास पोहोचली आहे.

Swipe up for next shorts
Junaid Khan sat outside at Ira Khan wedding
3 / 30

बहिणीच्या लग्नात कुटुंबाने दिली नाही कोणतीच जबाबदारी, बाहेर बसला होता जुनैद खान, कारण…

आमिर खानचा मुलगा जुनैद खानचा दुसरा चित्रपट 'लवयापा' लवकरच थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. त्याचा पहिला चित्रपट 'महाराज' नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. जुनैदने सांगितलं की त्याला पार्ट्यांमध्ये जाणं आवडत नाही, त्यामुळे आयरा खानच्या लग्नातही त्याला कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती. तो कौटुंबिक निर्णयांमध्येही भाग घेत नाही. 'लवयापा' चित्रपटात खुशी कपूरदेखील आहे आणि अद्वैत चंदनने दिग्दर्शन केले आहे.

Swipe up for next shorts
Does Eating Ghee Really Make You Fat
4 / 30

तुपाचे सेवन केल्याने लठ्ठपणा वाढतो का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…

खरंच फॅट्सच्या सेवनाने लठ्ठपणा वाढतो का? याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने मुंबई येथील एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ वेदिका प्रमानी यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली.

Akshay Kumar sells apartment in Mumbai
5 / 30

अक्षय कुमारने विकले मुंबईतील अपार्टमेंट, झाला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा नफा

अभिनेता अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' चित्रपट आज प्रदर्शित झाला. त्याचे मागील काही चित्रपट फ्लॉप झाल्याने त्याने बोरीवली येथील अपार्टमेंट विकले. २०१७ मध्ये २.३८ कोटींना घेतलेले अपार्टमेंट त्याने ४.२५ कोटींना विकले. स्काय सिटी प्रकल्पातील हे अपार्टमेंट १०७३ चौरस फूट असून दोन गाड्यांची पार्किंग आहे. अक्षय सध्या जुहूतील ८० कोटींच्या आलिशान घरात राहतो.

karan veer mehra second wife got married
6 / 30

करण वीर मेहराच्या दुसऱ्या बायकोने केलं लग्न, मंदिरात बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ

'बिग बॉस १८' चा विजेता करण वीर मेहरा चर्चेत आहे. त्याच्या दुसऱ्या पत्नीने, निधी सेठने, बंगळुरूच्या मंदिरात साधेपणाने लग्न केले आहे. निधीने गुलाबी बनारसी साडी आणि सोन्याचे दागिने घातले होते, तर तिच्या पतीने निळा फ्लोरल कुर्ता पायजमा घातला होता. सोशल मीडियावर फोटो शेअर करत निधीने तिच्या नवऱ्याचे आभार मानले आणि त्यांच्या नात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Father of accused says photo of attacker from CCTV doesnt match with son
7 / 30

सैफ अली खान प्रकरणातील आरोपीच्या वडिलांचा दावा, म्हणाले, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा…

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला होता, ज्यात तो गंभीर जखमी झाला. ५ दिवसांच्या उपचारानंतर तो घरी परतला आहे. हल्लेखोर मोहम्मद शरिफुल इस्लाम शहजादला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, आरोपीच्या वडिलांनी दावा केला की पोलिसांनी चुकीच्या व्यक्तीला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती त्यांच्या मुलासारखी दिसत नाही, असे त्यांनी सांगितले. तरीही, पोलिसांना सैफच्या घरातून मिळालेले बोटांचे ठसे आरोपीशी जुळत आहेत.

elizabeth ekadashi fame sayali bhandakavathekar talk about audition
8 / 30

‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटातील झेंडूच्या भूमिकेसाठी ‘अशी’ झाली होती ऑडिशन

परेश मोकाशी यांच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘एलिझाबेथ एकादशी’. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या चित्रपटात श्रीरंग महाजन, सायली भांडाकवठेकर, पुष्कर लोणकर, नंदिता धुरी हे कलाकार मंडळी झळकले होते. यामधील झेंडूला म्हणजे सायली भांडाकवठेकरने साकारलेल्या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. त्यामुळे अजूनही ‘एलिझाबेथ एकादशी’मधील झेंडूचे सीन सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात.

Elizabeth Ekadashi fame Sayali Bhandarkavathekar Currently studying Physiotherapy
9 / 30

“बांगड्या गरम, बांगड्या गरम…” म्हणणारी ‘ती’ झेंडू सध्या काय करते? जाणून घ्या..

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपट २०१४मध्ये प्रदर्शित झाला होता. या मराठी बालपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटातील मुक्ता उर्फ झेंडू म्हणजेच सायली भंडाकवठेकर चांगलीच भाव खाऊ गेली. तिचा “बांगड्या गरम, बांगड्या गरम…” हा सीन सुपरहिट झाला. अजूनही सोशल मीडियावर या सीनचे व्हिडीओ व्हायरल होतं असतात. पण, ‘एलिझाबेथ एकादशी’मधील सायली सध्या काय करते? जाणून घ्या…

gold silver price hike today
10 / 30

सोन्याचा दर ८० हजाराच्या पार, चांदीचाही वाढला भाव, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

गेल्या महिन्याच्या तुलनेत चार साडेचार हजाराने सोने महागले आहे. तसेच चांदीच्या दरात सुद्धा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ८०, २९० रुपये तर चांदीचा दर ९२, १३० रुपये किलो आहे. सोने चांदीच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार. जाणून घेऊ या, आजचा सोने चांदीचा दर कसा आहे.

Avinash Narkar And Aishwarya Narkar why constantly do reel videos
11 / 30

अविनाश-ऐश्वर्या नारकरांचा सतत Reel व्हिडीओ करण्यामागे आहे ‘हा’ हेतू, अभिनेते म्हणाले…

अभिनेते अविनाश नारकर यांचं सध्या ‘पुरुष’ नावाचं नाटक रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने मराठी नाट्यसृष्टीतील गाजलेलं ‘पुरुष’ नाटक पुन्हा रंगभूमीवर पाहायला मिळत आहे. या नाटकात अविनाश नारकर यांच्यासह स्पृहा जोशी, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे आणि शरद पोंक्षे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘पुरुष’ या नाटकाच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी अविनाश नारकरांनी ‘तारांगण’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी अविनाश नारकर यांनी सतत रील व्हिडीओ करण्यामागचा हेतू सांगितला.

Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
12 / 30

“मी हल्लेखोराला घट्ट पकडलं होतं, पण…”; सैफ अली खानने मुंबई पोलिसांना सांगितला घटनाक्रम

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे येथील घरी चोरीच्या उद्देशाने आलेल्या हल्लेखोराने हल्ला केला, ज्यात सैफ गंभीर जखमी झाला. लिलावती रुग्णालयात उपचारानंतर पाच दिवसांनी त्याला डिस्चार्ज मिळाला. सैफने पोलिसांना घटनेची संपूर्ण माहिती दिली. हल्लेखोराने सैफवर वारंवार चाकूने वार केले. आरोपी बांगलादेशी असून त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस तपास सुरू आहे.

riya sen ashmit patel leaked MMS controversy
13 / 30

दिग्गज अभिनेत्रीची नात, एका गाण्याने बनली स्टार; सलग १२ फ्लॉप चित्रपट, MMS लीक झाला अन्…

९० च्या दशकात 'याद पिया की आने लगी' या गाण्याने रिया सेन घराघरात प्रसिद्ध झाली. तिचं चित्रपटसृष्टीतील पदार्पण 'स्टाइल' या चित्रपटातून झालं, पण सलग १२ फ्लॉप चित्रपटांमुळे तिचं करिअर संपलं. वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिलेल्या रियाचं नाव जॉन अब्राहम, युवराज सिंग यांच्याशी जोडलं गेलं. अखेर तिने २०१७ मध्ये शिवम तिवारीशी लग्न केलं. रिया एक प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगना आणि योग शिक्षक आहे.

Daily Horoscope 24 January 2025| Ajche Rashibhavishya in Marathi
14 / 30

अनुराधा नक्षत्रात कोणाचं बदलणार नशीब? १२ पैकी या राशींना होणार धनलाभ, वाचा आजचे राशिभविष्य

24 January 2025 Horoscope and Panchang: आज २४ जानेवारी २०२५ रोजी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. दशमी तिथी संध्याकाळी ७ वाजून २६ मिनिटांपर्यंत राहील. शनिवारी पहाटे ५ वाजून ८ मिनिटांपर्यंत वृद्धी योग राहील. तसेच, २४ जानेवारीला अनुराधा नक्षत्र शनिवारी सकाळी ७ वाजून ८ मिनिटांपर्यंत राहील. याशिवाय शनिवारी संध्याकाळी ५ वाजून ३८ मिनिटांनी बुध मकर राशीत प्रवेश करेल. दरम्यान, आज अनुराधा नक्षत्रात मेष ते मीन राशींचा दिवस कसा जाईल हे आपण जाणून घेऊयात…

vadapav
15 / 30

‘वडापाव’चा वर्ल्ड्स ५० बेस्ट सँडविचेसमध्ये समावेश; एकमेव भारतीय पदार्थ

मुंबईचा प्रसिद्ध वडापाव जागतिक स्तरावर ओळखला जातो. 'टेस्ट ॲटलस'ने वडापावला जगातील ५० सर्वोत्तम सँडविचमध्ये स्थान दिले आहे. यंदा वडापाव ३९व्या क्रमांकावर आहे. वडापाव हा एक साधा पण चवदार पदार्थ आहे, ज्यात मऊ पाव आणि कुरकुरीत बटाटा पॅटी असते. १९६६ साली दादर स्टेशनाबाहेर अशोक वैद्य यांच्या गाडीवर वडापावचा जन्म झाला असे मानले जाते.

Akshay Kumar dismisses Vivek Oberoi claim he went to bed when guests were having dinner
16 / 30

रात्री ९ वाजता झोपतो, अक्षय कुमारची कबुली; रितेश देशमुख-विवेक ओबेरॉय जेवताना खरंच झोपलेला?

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या 'स्काय फोर्स' चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. एका मुलाखतीत त्याच्या शिस्तबद्ध जीवनशैलीबद्दल विचारले असता, अक्षयने पाहुण्यांचे आदरातिथ्य चांगले करतो असे सांगितले. विवेक ओबेरॉयने एकदा अक्षयने रात्री ९.३० वाजता झोपायला गेल्याचा किस्सा सांगितला होता, पण अक्षयने तो दावा फेटाळला. विवेकने अक्षयने त्याच्या करिअरच्या कठीण काळात मदत केल्याचेही सांगितले.

Marathi actress Nivedita Saraf Reaction on Ladki Bahin Yojana
17 / 30

“नुसते पैसे देण्यापेक्षा…”, ‘लाडकी बहीण योजने’वर निवेदिता सराफ यांची प्रतिक्रिया

ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ सध्या ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटात निवेदित सराफ महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. २४ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्यानिमित्ताने अलीकडेच निवेदिता सराफ यांनी ‘तारांगण’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘लाडकी बहीण योजने’विषयी भाष्य केलं. निवेदिता सराफ ‘लाडकी बहीण योजने’बाबत नेमकं काय म्हणाल्या? जाणून घ्या…

Saif Ali khan attacker
18 / 30

सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे पश्चिम बंगाल कनेक्शन काय?

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या शरीफुल इस्लामचे सीम कार्ड पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील बारा अंदुलिया गावातील व्यक्तीच्या नावे होते. शरीफुलने बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करून मुंबईत काम केले. गावातील अनेक तरुण मुंबईत कामासाठी जातात. सीम कार्ड खुकुमोनी जहांगीरच्या नावावर होते, ज्याचा फोन हरवला होता. गावकऱ्यांना याबाबत आश्चर्य नाही.

Sarang Punekar was a strong supporter of the Ambedkarite movement
19 / 30

सावित्रीबाई फुले विद्यापीठातील उच्चशिक्षित तृतीयपंथीय विद्यार्थी सारंग पुणेकरची आत्महत्या

पुणे January 23, 2025

सारंग पुणेकर, सावित्रीबाई फुले विद्यापीठातील पहिल्या उच्चशिक्षित ट्रान्सजेंडर विद्यार्थी, यांनी जयपूरमध्ये आत्महत्या केली. त्यांनी ट्रान्सजेंडर समुदायासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले होते आणि लॉकडाऊनमध्ये वंचितांना मदत केली होती. आंबेडकर चळवळीच्या समर्थक असलेल्या सारंग यांनी NRC आणि CAA विरोधात आवाज उठवला होता. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

OTT Release this week sweet dreams
20 / 30

या आठवड्यात मनोरंजनाची मेजवानी, वाचा OTT वर प्रदर्शित होणाऱ्या कलाकृतींची यादी!

ओटीटी January 23, 2025

या आठवड्यात ओटीटीवर अनेक चित्रपट व सीरिज रिलीज होणार आहेत. 'हिसाब बराबर' हा आर माधवनचा डार्क कॉमेडी चित्रपट २४ जानेवारीला Zee5 वर येईल. मिथिला पालकरचा 'स्वीट ड्रीम्स' हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट २४ जानेवारीला डिस्ने+ हॉटस्टारवर प्रदर्शित होईल. 'द नाईट एजंट सीझन २', 'हार्लेम सीझन ३', 'द ट्रॉमा कोड', 'Dìdi', 'शाफ्टेड' आणि 'द सँड कॅसल' हे देखील विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत.

auto driver who rushed saif ali khan refused to disclose amount he got
21 / 30

“मी सैफला वचन दिलंय…”, रिक्षा चालक अभिनेत्याला भेटल्यावर काय म्हणाला?

बॉलीवूड January 23, 2025

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानने त्याला वेळेत लिलावती रुग्णालयात पोहोचवणारा रिक्षा चालक भजन सिंह राणाचे आभार मानले आहेत. राणाने सैफला रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात नेले होते आणि भाडं घेतलं नव्हतं. सैफने त्याला आर्थिक मदत दिली, पण रकमेबाबत खुलासा नाही. राणाने सैफच्या आई शर्मिला टागोर यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. सैफवर १६ जानेवारीला हल्ला झाला होता, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Kundli gun Milan for Marriage
22 / 30

लग्नासाठी पत्रिकेतील ३६ पैकी किती गुण जुळणे आवश्यक? ज्योतिषी काय सांगतात

विवाह हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र बंधनांपैकी एक मानला जातो. पण, पती-पत्नीचे वैवाहिक आयुष्य सुखा-समाधानाचे जावे यासाठी लग्नाआधी दोघांची कुंडली जुळते का हे पाहिले जाते. मुला-मुलीने एकमेकांना पसंत केल्यानंतर दोघांच्या घरचे आधी जन्मपत्रिका आणि कुंडली पाहतात. कारण हिंदू धर्मात असे मानले जाते की, लग्नानंतर दोन व्यक्ती एकमेकांशी जोडल्या जातात, ज्यामुळे भविष्यातील समस्या टाळता येतात. या कारणास्तव कुंडली जुळवणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

How to park a car fell down from first floor car parking fail video viral on social media car parking tips
23 / 30

पार्किंग करताना कार खालीच कोसळली! गाडी पार्क करण्याआधी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

ऑटो January 23, 2025

Car Parking Crash Video: सगळ्यात दुर्लक्षित ड्रायव्हिंग स्किल काय आहे? तर गर्दीच्या रस्त्यावर समांतर पार्क करण्याची क्षमता, असं अनेकांचं म्हणण असेल. परंतु खरं सांगायचं झालं, तर फक्त ‘पार्किंग’ हेच मूळ ड्रायव्हिंग स्किल आहे. सुमारे १.४ अब्ज लोकसंख्या असलेल्या देशात, स्क्रॅच-फ्री कार पाहणं हे युनिकॉर्न शोधण्याइतके दुर्मीळ आहे. अशा सगळ्या घटनांपासून शिकून आपलं कौशल्य वाढवण्याऐवजी आपण फक्त म्हणतो की, असं तर नेहमीच घडत राहतं.

Grave Torture on Netflix
24 / 30

हॉरर सिनेमे बघायला आवडतात? नेटफ्लिक्सवरील ‘हा’ भयंकर चित्रपट पाहून हादरून जाल

ओटीटी January 23, 2025

थिएटर्स आणि ओटीटीवर दर आठवड्याला अनेक चित्रपट रिलीज होतात. ओटीटीवरही चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतो. मे २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला इंडोनेशियन सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट "ग्रेव्ह टॉर्चर" आता नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. जोको अन्वर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात फरादिना मुफ्ती, रजा रहाडियन, क्रिस्टीन हकीम आणि स्लेमेट राहार्डजो यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला इंडोनेशियन चित्रपट महोत्सवात १७ नामांकने मिळाली होती. IMDb वर याला ६.२ रेटिंग मिळाले आहे.

Royal Enfield Scram 440 price, features, and specifications in Marathi
25 / 30

नवीन वर्षात Royal Enfield चा धमाका! बुलेटप्रेमींनो धासू Scram 440 लाँच, किंमत फक्त इतकी

ऑटो January 23, 2025

Royal Enfield Scram 440 : रॉयल एनफिल्ड बाईक्सचा भारतात एक मोठा चाहता वर्ग आहे. विशेषत: तरुणाईमध्ये या क्लासिक बाईकची मोठी क्रेझ पाहायला मिळते, मजबूत आणि दमदार लूकसाठी ही बाईक प्रसिद्ध आहे. अशात तुम्हीही नवीन रॉयल एनफिल्ड बाईक घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण कंपनीने तरुणांसाठी एक जबरदस्त बाईक लाँच केली आहे. Scream 440 असे या बाईकचे नाव असून ज्याची किंमत फक्त २.८ लाख आहे.

Ajit Pawar avoided to sitting next to sharad pawar
26 / 30

शरद पवारांच्या बाजूला बसणं का टाळलं? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले…

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अजित पवार यांनी शरद पवार यांच्या बाजूला बसण्याचे टाळले. त्यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना शरद पवारांच्या शेजारी बसवले. यावर स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की, बाबासाहेबांना शरद पवारांशी बोलायचे होते आणि त्यांचा आवाज दोन खुर्च्या सोडूनही ऐकू जाऊ शकतो. कार्यक्रमात विविध मान्यवर उपस्थित होते.

pune cyber crime
27 / 30

पुण्यात निवृत्त बँक मॅनेजर महिलेला २.२२ कोटींचा गंडा; दीन दयाल उपाध्याय यांच्या नावाने…

प्रशासनाकडून सातत्याने आवाहन करूनही ऑनलाईन घोटाळ्यांचं प्रमाण कमी होताना दिसत नाही. पुण्यात ६२ वर्षीय निवृत्त महिला बँक मॅनेजरला २ कोटी २२ लाखांचा गंडा घालण्यात आला. भामट्यांनी विविध सरकारी अधिकारी आणि अर्थमंत्रालयातील ओळखी सांगून महिलेला विमा पॉलिसी खरेदीसाठी पैसे मागितले. फसवणूक लक्षात आल्यानंतर महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे.

Aparna Vinod Divorces Husband Rinil Raj
28 / 30

२ वर्षात मोडला प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी केलेलं लग्न

मनोरंजन January 23, 2025

प्रसिद्ध अभिनेत्री अपर्णा विनोद हिने पती रिनिलराज पीकेपासून घटस्फोट घेतल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. तिने लग्न व पतीबरोबरचे सर्व फोटो डिलीट केले आहेत. अपर्णाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या निवेदनात लग्न हा आयुष्यातील कठीण टप्पा असल्याचे म्हटले आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांनी लग्न केले होते. अपर्णाने 'कोहिनूर' आणि 'भैरवा' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Sanjay raut on balasaheb thackeray
29 / 30

“बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न दिलात तर तो वीर सावरकरांचा गौरव ठरेल”, संजय राऊत

संजय राऊत यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदींवर टीका करताना म्हटलं की, "बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर मतांसाठी करणं योग्य नाही. बाळासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीत लढा दिला, सत्ता नसतानाही मराठी माणसासाठी संघर्ष केला. अमित शाह आणि नरेंद्र मोदींनी शिवसेनेची स्थिती खराब केली आहे. बाळासाहेबांना भारतरत्न देणं गरजेचं आहे, ज्यामुळे सावरकरांचाही गौरव होईल."

Ram Gopal Varma convicted in cheque bounce case
30 / 30

राम गोपाल वर्मा यांना कोर्टाने सुनावली ३ महिने तुरुंगवासाची शिक्षा, नेमके प्रकरण काय?

बॉलीवूड January 23, 2025

बॉलीवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना मुंबईतील अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने चेक बाऊन्स प्रकरणात दोषी ठरवून तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. वर्मा न्यायालयात हजर नसल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. २०१८ मध्ये दाखल झालेल्या या खटल्यात वर्मा यांना ३.७२ लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी लागेल, अन्यथा आणखी तीन महिने तुरुंगवास भोगावा लागेल.