‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटातील झेंडूच्या भूमिकेसाठी ‘अशी’ झाली होती ऑडिशन
परेश मोकाशी यांच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘एलिझाबेथ एकादशी’. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या चित्रपटात श्रीरंग महाजन, सायली भांडाकवठेकर, पुष्कर लोणकर, नंदिता धुरी हे कलाकार मंडळी झळकले होते. यामधील झेंडूला म्हणजे सायली भांडाकवठेकरने साकारलेल्या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. त्यामुळे अजूनही ‘एलिझाबेथ एकादशी’मधील झेंडूचे सीन सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात.