gautami patil share video with alka kubal sai tamhankar and shiv thakare
1 / 30

Video: आता गौतमी पाटील अलका कुबल, सई ताम्हणकर अन् शिव ठाकरेबरोबर झळकणार

गौतमी पाटील हिने आपल्या दिलखेच अदा आणि नृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. त्यामुळे ती नेहमी चर्चेत असते. तिचा चाहता वर्ग खूप मोठा प्रमाणात आहे. म्हणून तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते. सध्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे प्रमाण आणि तिची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत आहे. अशी ही लोकप्रिय नृत्यांगना मराठी सिनेसृष्टीतही सक्रिय झाली आहे.

Swipe up for next shorts
no leave blackout social viral
2 / 30

“मेलात तरी तुम्हाला ३ दिवस आधी कंपनीला सांगावं लागेल”, नेटिझन्सचा संताप; नोटीस व्हायरल!

ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढल्यामुळे काही कार्यालयांमध्ये सुट्ट्या रद्द केल्या जातात. सोशल मीडियावर अशाच एका नोटीसचा फोटो व्हायरल झाला आहे, ज्यात २५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत सुट्ट्या रद्द केल्याचे नमूद आहे. नेटिझन्सनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्यांच्या अनुभवांबद्दल सांगितले आहे, जसे की एका कंपनीत उन्हाळ्यात सुट्ट्या न देणे आणि कमी पगार देणे. तर काहींनी चांगले अनुभवही शेअर केले आहेत.

Swipe up for next shorts
vastu shastra vastu tips for house what is the right direction of mirror and watch
3 / 30

घरात ‘या’ दिशेला चुकूनही लावू नका घड्याळ अन् आरसा, करावा लागेल भयंकर संकटाचा सामना!

Vastu Tips For House: प्रत्येक घरात सहसा आरसा आणि घड्याळ असते. लोक या वस्तू आपल्या आवडीनुसार आणि जागा बघून घरातील भिंतींवर लावतात. पण, वास्तुशास्त्रानुसार असे करणे चुकीचे आहे. कारण वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक दिशेला महत्त्व आहे, त्यामुळे जर तुम्ही घरामध्ये आरसा आणि घड्याळ चुकीच्या दिशेने लावले असेल तर त्याचा तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होत असतो; याने तुमच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होतो. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार, घरातील कोणत्या दिशेच्या भिंतीवर आरसा आणि घड्याळ लावले पाहिजे जाणून घेऊ…

Swipe up for next shorts
Deepinder Goyal Zomato Recruitements
4 / 30

बिनपगारी अन् फुल्ल अधिकारी, झोमॅटोच्या ‘या’ पदासाठी आले दहा हजार अर्ज

झोमॅटोने चिफ ऑफ स्टाफ पदासाठी पगाराशिवाय वर्षभर काम करण्याची आणि २० लाख रुपये भरण्याची अट ठेवली आहे. या पदासाठी १० हजार अर्ज आले आहेत. पात्रतेत भुकेला, संवेदनशील, नम्र, उत्साही आणि उत्तम संवादकौशल्य असणे आवश्यक आहे. पहिल्या वर्षानंतर ५० लाखांहून अधिक पगार दिला जाईल. अर्जदारांकडे पैसे असण्याबाबत विविध निरीक्षणे नोंदवली आहेत.

Marathi actress Vishakha Subhedar share special post for television day
5 / 30

“आजवर या प्रवासात…”, विशाखा सुभेदारच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, “माझ्याकडून…”

अभिनेत्री विशाखा सुभेदार सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कधी फोटो तर कधी डान्स व्हिडीओ शेअर करत असते. यामुळे अनेकदा ट्रोलही होते. पण, ट्रोलर्सना विशाखा सुभेदार सडेतोड उत्तर देते. शिवाय आजूबाजूच्या घडामोडींबाबतही अभिनेत्री परखड भाष्य करत असते. नुकतीच विशाखा सुभेदारने एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

Adani Group Chairman Gautam Adani Fraud Bribery Case News in Marathi
6 / 30

अदाणी समूहानं जारी केलं अमेरिकेतील आरोपांवर निवेदन; भ्रष्टाचार प्रकरणाबाबत मांडली भूमिका!

गौतम अदाणींवर अमेरिकेत भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण झाली. आरोपानुसार, अदाणींनी सौर ऊर्जा कंत्राट मिळवण्यासाठी २,००० कोटी रुपयांची लाच दिली. यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. अदाणी समूहाने सर्व आरोप फेटाळले असून, कायद्यांचे पालन करण्याचे आश्वासन दिले आहे. विरोधी पक्षांनी यावरून सरकारवर टीका केली आहे.

gharoghari matichya chuli fame Reshma Shinde share kelvan photos
7 / 30

फुलांची सजावट, पंचपक्वान्न, आहेर अन्….; मराठी कलाकारांनी रेश्मा शिंदेचं ‘असं’ केलं केळवण

‘नांदा सौख्यभरे’, ‘चाहूल’, ‘लगोरी’, ‘रंग माझा वेगळा’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांमधून घराघरात पोहोचली अभिनेत्री रेश्मा शिंदे लवकरच आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवणार आहे. म्हणजेच रेश्मा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतेच तिने केळवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे आता रेश्मा शिंदेच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसंच तिचा होणारा नवरा कोण आहे? याची उत्सुकता चाहत्यांनी लागली आहे.

AJit Pawar vs Yugendra Pawar in Maharashtra Baramati Constituency
8 / 30

Ajit Pawar vs Sharad Pawar: यंदा बारामतीकर कुणाच्या बाजूने? मतदार म्हणतात,”दादाच येईल, पण…

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून, २३ नोव्हेंबर रोजी निकाल येणार आहेत. एग्झिट पोलमध्ये महायुतीला पुन्हा सत्ता मिळण्याचे संकेत आहेत. बारामतीत अजित पवार आणि शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार यांच्यात काँटे की टक्कर आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या आढाव्यानुसार, अजित पवारांना बारामतीकरांचा पाठिंबा आहे. बारामतीत पवार कुटुंबाचे वर्चस्व कायम आहे.

Chewing ice habit is a deficiency and it can harm your health says experts
9 / 30

तुम्हालाही बर्फ चघळण्याची सवय आहे? तज्ज्ञ सांगतात ही सवय ठरू शकते आरोग्यासाठी धोकादायक

 गोड किंवा चवदार खायचंय असं वाटणं अगदी सामान्य आहे, परंतु जर तुम्हाला बऱ्याचदा बर्फ खाण्याची इच्छा होत असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. “बऱ्याच जणांनी त्यांच्या आयुष्यात एकदा तरी बर्फ चघळला आहे. परंतु, सतत बर्फ चघळावा किंवा खावासा वाटणे विविध आरोग्य समस्या दर्शवू शकते,” असे डॉ. प्रतीक तिबडेवाल, सल्लागार गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड यांनी सांगितले.

gharoghari matichya chuli fame reshma shinde will get marry kelvan photos viral
10 / 30

मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात; केळवणाचे फोटो आले समोर

अलीकडेच ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील श्वेता म्हणजेच अभिनेत्री अनघा अतुलचा भाऊ अखिलेश भगरे विवाहबद्ध झाला. अखिलेशने वैष्णवी जाधव हिच्याशी लग्नबंधनात अडकून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. आता लवकरच मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री बोहल्यावर चढणार आहे. तिच्या केळवणाचे फोटो समोर आले आहेत.

Who Will Be The Next CM? This Exit Poll Prediction
11 / 30

Exit Poll : शिंदे, फडणवीस, ठाकरे की अजित पवार? मुख्यमंत्री म्हणून पसंती कुणाला?

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली असून ५९ टक्के मतदान झाले आहे. एक्झिट पोल्सनुसार महायुतीचं सरकार येण्याची शक्यता आहे. पिपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार एकनाथ शिंदे यांना ३५.८ टक्के लोकांची पहिली पसंती आहे. २३ नोव्हेंबरला निकाल लागणार असून महायुतीला १५२ ते १६० जागा मिळण्याचा अंदाज आहे. महाविकास आघाडीला १३० ते १३८ जागा मिळण्याची शक्यता आहे.

Vidhan Sabha Election Exit Poll Result
12 / 30

लोकसभेला एग्झिट पोलचे अंदाज खोटे ठरले होते, विधानसभेला काय होणार? महायुती की मविआ?

2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज एकाच टप्प्यात मतदान पार पडलं. मतदानानंतर लगेचच एग्झिट पोलचे अंदाज समोर आले. बहुतेक एग्झिट पोल्सनुसार महायुतीला बहुमत मिळेल असा अंदाज आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत एग्झिट पोलचे अंदाज उलटे ठरले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हे अंदाज खरे ठरतील का, याची उत्सुकता आहे.

Mumbai Exit polls
13 / 30

मुंबईत आवाज कुणाचा? महायुतीची गर्जना की मविआची डरकाळी? एक्झिट पोलचे अंदाज वाचा!

मुंबई November 21, 2024

2024 मुंबई विधान सभा निवडणूक एक्झिट पोल अपडेट्स: मुंबईच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तीव्र स्पर्धा आहे. जेवीएसच्या एक्झिट पोलनुसार, मुंबईतील ३६ मतदारसंघांपैकी महायुतीला १७ ते १९ जागा आणि महाविकास आघाडीला १६ ते १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. अपक्ष आणि इतर पक्षांना एक जागा मिळू शकते. त्यामुळे स्पष्ट बहुमत दिसत नाही.

Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Results 2024
14 / 30

राष्ट्रीय पक्षांचा राज्यात झगडा; काँग्रेस की भाजपा? मतदार कुणाच्या पाठीशी? वाचा अंदाज!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक यंदा चर्चेत राहिली. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन पक्षांच्या फुटलेल्या गटांमुळे सत्ताधारी व विरोधक दोन्ही बाजूंना अस्तित्व जाणवत होतं. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने १३ जागा जिंकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र, एग्झिट पोलमध्ये महायुतीला विजयी आघाडी मिळेल असे अंदाज वर्तवले जात आहेत. विविध एग्झिट पोल्सनुसार महायुतीला १२२ ते १९५ जागा मिळण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar NCP vs Sharad Pawar NCP Exit Poll Updates in Marathi
15 / 30

शरद पवार की अजित पवार? एग्झिट पोलनुसार मतदारांची साथ कुणाला? वाचा सर्व अंदाज!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून चालू असलेला राजकीय संघर्ष शेवटाकडे आला आहे. मतदानाची टक्केवारी सत्ताधाऱ्यांसाठी दिलासादायक तर विरोधकांसाठी चिंता वाढवणारी ठरली आहे. एग्झिट पोल्समध्ये महायुतीला विजयी कल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे राज्यात विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. एग्झिट पोल्सनुसार, अजित पवार गटाला १४ ते २८ जागा आणि शरद पवार गटाला २५ ते ४६ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

jharkhand
16 / 30

झारखंडमध्ये पुन्हा इंडिया आघाडीचीच सत्ता? NDA च्या पदरात किती जागा? अंदाज काय सांगतात?

2024 Jharkhand Vidhan Sabha Election Exit Poll Updates : झारखंडमध्ये मतदानाची वेळ संपली असून आता विविध अंदाज येऊ लागले आहेत. एक्सिस माय इंडिया एक्झिट पोलनुसार, झारखंडमध्ये सत्ताधारी इंडिया आघाडीला पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. ५२ पेक्षा जास्त जागा इंडिया आघाडीला मिळणार असल्याचा अंदाज आहे. भाजपासमर्थित एनडीएला फक्त २३ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर ३ अपक्ष निवडून येऊ शकतात.

success story of police constable kavita who had big dreams but her father did not want his daughter to study
17 / 30

वडिलांचा शिक्षणाला विरोध, पण मुलीने मानली नाही हार; वाचा स्वप्न साकार करणाऱ्या ‘तिची’ गोष्ट

करिअर November 21, 2024

कविताचा जन्म तेलंगणातील नारायणपेट जिल्ह्यातील एका दुर्गम गावात झाला. त्यांच्या कुटुंबात सात जण आहेत. उत्पन्नासाठी त्यांचे कुटुंब शेतीवर अवलंबून होते. अभ्यास साहित्याचा अभाव, स्टेशनरी आणि मुख्य म्हणजे स्वयं-अभ्यासासाठी वेळ नसणे यांसारख्या आव्हानांना तोंड देत असतानाही कविता आपला अभ्यास सुरू ठेवण्यासाठी ठाम होती.

Aai kuthe kay karte fame abhishek Deshmukh shared emotional post
18 / 30

“गूड बाय यश अरुंधती देशमुख…”; ‘आई कुठे…’ फेम अभिषेक देशमुखने लिहिली भलीमोठी भावुक पोस्ट

१९ नोव्हेंबरला ‘आई कुठे काय करते’ मालिकेचं शेवटचं चित्रीकरण पार पडला. ३० नोव्हेंबरला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. त्यामुळे मालिकेतील कलाकार आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. या मालिकेतील यश म्हणजेच अभिनेता अभिषेक देशमुखने नुकतीच सोशल मीडियावर भलीमोठी भावुक पोस्ट लिहिली आहे.

Maharashtra Election 2024 Marathi actress Girija Oak Godbole to cast her vote
19 / 30

न्यूझीलंड टू पुणे; ३२ ते ३६ तासांचा प्रवास केल्यानंतर गिरीजा ओकने बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Election 2024 : आज संपूर्ण राज्यभरात मतदान प्रक्रिया सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केलं जात आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून ६ वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू असणार आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. या दोन्ही सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री गिरीजा ओकने आपलं कर्तव्य पार पाडलं आहे. न्यूझीलंडहून प्रवास करून गिरीजाने पुण्यात मतदान केलं आहे.

marathi actor Shashank Ketkar shared the official Indian People Manifesto after voting for Maharashtra Election 2024
20 / 30

“राजकारणाचा स्तर प्रचंड घसरला असला तरी…”, शशांक केतकरच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला…

आज सकाळपासून मराठी कलाकार मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी, सोनाली कुलकर्णी, अभिजीत केळकर, मृण्मयी देशपांडे, तेजस्विनी पंडित, हेमंत ढोमे, जुई गडकरी, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर अशा सगळ्या मराठी कलाकारांनी मतदान केलं आहे. मतदान करून झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या चाहत्यांना देखील मतदान करण्याच आवाहन कलाकार मंडळी करत आहेत. अशातच अभिनेता शशांक केतकरच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Voting in Maharashtra
21 / 30

राज्यात किती वाजेपर्यंत करता येणार मतदान? वेळ निघून जाण्याआधी लगेच मतदान केंद्रावर जा!

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदान झाले. नागरिकांना मतदानासाठी आवाहन करण्यात येत आहे. मतदान केंद्रांवर दुपारनंतर गर्दी वाढली असून, संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येईल. २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. ९.७ कोटी मतदार ४१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

95 Year Old Voter
22 / 30

९५ वर्षांच्या आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले, “लोकशाही बळकट…”

गोंदिया येथे ९५ वर्षीय लक्ष्मण बेडेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी तरुणांना लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले. सरकारने गृहमतदानाची सोय केली असतानाही त्यांनी बूथवर जाऊन मतदान केले. त्यांच्या मुलगा प्रसाद बेडेकर यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांनी लोकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हे पाऊल उचलले. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचा सामना रंगला असून २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.

Marathi actress Rupali Bhosle reveal reason behind of aai kuthe kay karte serial extended
23 / 30

‘आई कुठे काय करते’ मालिका का लांबवली? रुपाली भोसलेने सांगितलं यामागचं सत्य, म्हणाली…

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेली मालिका ‘आई कुठे काय करते’ अखेर बंद होतं आहे. ३० नोव्हेंबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं. त्यामुळे सुरुवातीला मालिकेचा टीआरपी खूप चांगला होता. पण, मध्यंतरी मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांसाठी रटाळवाणे होते. प्रेक्षक सतत मालिका बंद करण्याची मागणी करत होते. पण, तरीही मालिका लांबवली. यामागचं नेमकं कारण आहे? हे संजना म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसलेने सांगितलं आहे.

Devendra Fadnavis on Anil Deshmukh
24 / 30

“दगड मागून मारला, तर पुढे कसं लागलं?”, देवेंद्र फडणवीसांचे प्रश्न!

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत सत्ताधारी भाजपने हा हल्ला बनावट असल्याचा आरोप केला आहे. महाविकास आघाडीने भाजपवरच हल्ला घडवल्याचा आरोप केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेला सिनेमा असे विशेषण दिले आहे. त्यांनी विचारले की, दगड मागून लागला तर पुढे कशी जखम झाली? तसेच, दहा किलो गोटा विंडशिल्डवर मारला तर ते तुटले का नाही? यावरून त्यांनी हा सिनेमा तयार करण्यात आल्याचा दावा केला.

Bigg Boss 18 Namrata Shirodkar birthday wish to sister Shilpa Shirodkar
25 / 30

Bigg Boss 18: शिल्पा शिरोडकरला धाकट्या बहिणीने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, म्हणाली..

‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात अशी एक सदस्य आहे, जिने ९०चं दशकात आपल्या बोल्ड आणि घायाळ अदांनी बॉलीवूड गाजवलं. पण काही काळानंतर तिची लोकप्रियता कमी झाली. मग तिने लग्न करून लंडन गाठलं आणि ती गृहिणी झाली. वैवाहिक जीवनात ती व्यग्र झाली. पण आता ‘बिग बॉस’चं १८वं पर्व गाजवतं आहे. अशी ही लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिल्पा शिरोडकर. आज शिल्पाचा वाढदिवस असून ती आता ५१ वर्षांची झाली आहे. यानिमित्ताने शिल्पाला मोठी बहीण नम्रता शिरोडकरने वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

aai kuthe kay karte fame Rupali Bhosle what will be taken from Sanjana
26 / 30

संजनाकडून काय घेऊन जाणार? अभिनेत्री रुपाली भोसले म्हणाली, “खऱ्या आयुष्यात…”

Aai Kuthe Kay Karte : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ सध्या शेवटच्या टप्प्या आहेत. ३० नोव्हेंबरपासून मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. काल, १९ नोव्हेंबरला मालिकेच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस पार पडला. यावेळी सर्व कलाकार मंडळी भावुक झालेले पाहायला मिळाले. यानिमित्ताने मालिकेतील कलाकारांनी विविध एंटरटेनमेंट चॅनेलशी संवाद साधला. यावेळीच अभिनेत्री रुपाली भोसलेने संजनाकडून काय घेऊन जाणार? याविषयी सांगितलं.

Amit thackeray meet Sada sarvankar
27 / 30

सिद्धिविनायक मंदिरात माहिमचे उमेदवार आमने-सामने; अमित ठाकरेंच्या कृतीने वेधलं लक्ष

राज्यात मतदानाला सुरुवात झाली असून सर्वपक्षीय उमेदवार मतदानासाठी बाहेर पडले आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे आणि विद्यमान आमदार सदा सरवणकर आमने-सामने आहेत. सिद्धिविनायक मंदिरात दोघेही भेटले आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या. अमित ठाकरेंनी सरवणकरांच्या खिशातील धनुष्यबाण सरळ करून सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी बाप्पाकडे काहीही मागितले नसल्याचे सांगितले.

supriya sule viral audio clip
28 / 30

Video: “ते रेकॉर्डिंग आल्या आल्या मी सगळ्यात आधी…”, सुप्रिया सुळेंची व्हायरल क्लिपवर…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंवर भाजपाने बिटकॉइन व्यवहारांद्वारे निवडणुकीसाठी निधी जमा केल्याचा आरोप केला आहे. भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी ऑडिओ क्लिप्सचा संदर्भ देत हे आरोप केले. सुप्रिया सुळेंनी हे आरोप फेटाळून लावले असून, सायबर क्राईमकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच, सुधांशु त्रिवेदींविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

Maharashtra Election 2024 Prajakta Mali Sonali Kulkarni Hemant Dhome marathi actors actress first to cast vote
29 / 30

“आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं…”, मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले..

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, आर्या आंबेकर, हेमंत ढोमे, रवी जाधव, सायली संजीव, मंदार चांदवडकर, तेजस्विनी पंडित, सुनील बर्वे, अभिजीत केळकर अशा अनेक मराठी कलाकारांनी मतदानाचं कर्तव्य पार पडलं आहे. यासंदर्भात मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.

Gold Silver Price Today 20 November 2024 in Marathi| maharashtra election 2024
30 / 30

ऐन निवडणुकीत सोन्याच्या दरात पुन्हा तेजी! नेमकं किती रुपयांनी महागलं; वाचा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणू २०२४ साठी आज (२० नोव्हेंबर) रोजी सर्वत्र मतदान होत आहे. मात्र मतदानाच्या आदल्या दिवसापासूनच देशात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी दिसून आली. सोन्याचे दर आज ७६ हजारांच्या आसपास पोहोचले आहेत. १९ नोव्हेंबच्या तुलनेत आज सोन्याचा दरात कोणतेही बदल झाले नाही, मात्र १८ आणि १९ नोव्हेंबरच्या तुलनेत हे दर जवळपास १२०० रुपयांनी वाढले आहेत. आज तुमच्या शहरात नेमके सोन्या-चांदीचे दर काय आहेत जाणून घेऊ….