रितेश देशमुख व जिनिलीयाच्या दोन्ही मुलांनी ‘असा’ साजरा केला दसरा, पाहा व्हिडीओ
दसरा सण: आज विजयादशमीचा उत्साह सगळीकडे आहे. रितेश आणि जिनिलीया देशमुख यांनीही दसरा साजरा केला. जिनिलीयाने इन्स्टाग्रामवर दोन व्हिडीओ शेअर केले, ज्यात मुलं रियान आणि राहिल आपट्याची पानं देत दसऱ्याच्या शुभेच्छा देताना आणि रावण दहन करताना दिसत आहेत. 'वाईटावर चांगल्याचा विजय' हा संदेश देणारे हे व्हिडीओ चर्चेत आहेत. जिनिलीया सोशल मीडियावर सक्रिय असून सण-उत्सवाचे फोटो शेअर करत असते.