मराठी चित्रपट मागे पडण्यामागचं महेश मांजरेकरांनी सांगितलं ‘हे’ कारण, म्हणाले…
गेल्या काही दिवसांपासून बरेच कलाकार सध्याच्या मराठी सिनेसृष्टीबाबत खंत व्यक्त करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे यांनी मराठी सिनेसृष्टी ऑक्सीजनवर असल्याचं गंभीर विधान केलं होतं. त्यानंतर आता लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माते, लेखक, अभिनेते महेश मांजरेकर यांनी मराठी सिनेसृष्टीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. “मराठी चित्रपट दिवसागणिक मागे-मागे जातोय,” असं महेश मांजरेकर म्हणाले.