सचिन खेडेकर तब्बल २१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर परतणार!
चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर तब्बल २१ वर्षांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीकडे वळले आहेत. 'भूमिका' या नवीन नाटकाद्वारे ते पुनरागमन करत आहेत. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि क्षितीज पटवर्धन लिखित या नाटकात खेडेकर कोणत्या रूपात दिसणार याची उत्सुकता आहे. जिगिषा आणि अष्टविनायक निर्मिती संस्थांनी हे नाटक सादर केले असून, याच महिन्यात ते रंगभूमीवर येणार आहे.