“मराठी हॉटेल मालकांचे परप्रांतीय वेटर…”; मराठी अभिनेता म्हणाला, “बेताल, बेलगाम…”
मराठी अभिनेता सौरभ गोखले सोशल मीडियावर सक्रिय असून, त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर मराठी हॉटेल मालकांच्या परप्रांतीय कर्मचाऱ्यांबद्दल टिप्पणी केली आहे. सौरभने म्हटले की, मालक नसताना हे कर्मचारी बेताल व बेलगाम असतात. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत असून, अनेकांनी त्याचे समर्थन केले आहे. सौरभने ‘योद्धा’, ‘सर्व लाइन व्यस्त आहेत’, ‘राधा ही बावरी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.