“नकोच तो अंधार…”, अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने अनोख्या अंदाजात दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
दिवाळीचा सण दरवर्षी प्रकाशमय आणि उत्साहाचं वातावरण घेऊन येतो. प्रत्येकाच्या जीवनात आनंद, नवचैतन्य घेऊन येणारा हा सण आहे. हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळी मानला जातो. आजपासून संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. यंदा अमावस्या दोन दिवस असल्यामुळे पाच दिवसांचा दिवाळी सण सहा दिवसांचा होतं आहे. दिवाळीनिमित्ताने सध्या सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. कलाकार मंडळीदेखील चाहत्यांना शुभेच्छा देत आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने आपल्या अनोख्या अंदाजात दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.