स्वप्नील जोशी लवकरच डॅशिंग अंदाजात झळकणार, म्हणाला, “माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा…”
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे स्वप्नील जोशी. स्वप्नीलने आजवर अनेक रोमँटिक चित्रपटात काम केलं आहे. त्यामुळे त्याला मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट हिरो म्हणून ओळखलं जात. पण, आता लवकरच स्वप्नील जोशी कधीही न पाहिलेल्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.