“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक
सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘मंगला’ चित्रपटात सुप्रसिद्ध गायिकेचा जीवनप्रवास लवकरच पाहायला मिळणार आहे. याच चित्रपटात शिवाली परब चेहऱ्यावर अॅसिड हल्ला झालेल्या मंगलाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. १७ जानेवारी २०२५ रोजी ‘मंगला’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक लाँच सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबलसह शशांक शेंडे यांनी शिवालीच्या कामाचं भरभरून कौतुक केलं.