अलका कुबल यांनी सांगितली पायलट लेकीबरोबरच्या ‘या’ फोटोमागची गोष्ट, म्हणाल्या…
९०च्या दशकात मराठी सिनेसृष्टीतील नायिकाप्रधान चित्रपटांचं पर्व गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अलका कुबल-आठल्ये. मराठी रसिक प्रेक्षक अलका कुबल यांच्यात आपली मुलगी, सून, ताई, आई हे नातं पाहत आले आहेत. अजूनही त्या प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. काही दिवसांपूर्वी अलका यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये त्या मोठी लेक, पायलट ईशानीबरोबर पाहायला मिळाल्या होत्या. अलका कुबल यांचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. पण, या फोटोमागची गोष्ट तुम्हाला माहितीये का?