…अन् अभिनेत्री नीना कुलकर्णी रंगमंचावरच कोसळल्या, नेमकं काय घडलं?
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री नीना कुळकर्णी सध्या ‘असेन मी… नसेन मी…’ या नाटकात महत्त्वाचे पात्र साकारत आहेत. नाटकाच्या एका प्रयोगादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली होती, तरीही त्यांनी प्रयोग पूर्ण केला. प्रेक्षकांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत प्रार्थना केली. नाटकाचे लेखक संदेश कुलकर्णी यांनी नीना यांची प्रकृती आता बरी असल्याचे सांगितले आहे.