मराठी अभिनेत्री लेखिका म्हणून करतेय पदार्पण, आधी मृणाल ठाकूरच्या सिनेमासाठी केलेलं काम
अभिनेत्री नेहा शितोळेने अनेक मराठी मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केल्यानंतर आता लेखिका म्हणून पदार्पण केले आहे. तिने 'देवमाणूस' चित्रपटासाठी पटकथा आणि संवाद लेखन केले आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या भूमिका आहेत. सई ताम्हणकर पहिल्यांदाच लावणी सादर करणार आहे. 'देवमाणूस' २५ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.