“नुसते पैसे देण्यापेक्षा…”, ‘लाडकी बहीण योजने’वर निवेदिता सराफ यांची प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ सध्या ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटात निवेदित सराफ महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. २४ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्यानिमित्ताने अलीकडेच निवेदिता सराफ यांनी ‘तारांगण’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘लाडकी बहीण योजने’विषयी भाष्य केलं. निवेदिता सराफ ‘लाडकी बहीण योजने’बाबत नेमकं काय म्हणाल्या? जाणून घ्या…