Video: पूजा चव्हाणने ऑस्ट्रेलियात साजरी केली पहिली मकर संक्रात; सासूबाईंची कमेंट चर्चेत
मराठी अभिनेत्री पूजा सावंतने लग्नानंतरची पहिली मकर संक्रात ऑस्ट्रेलियात साजरी केली. तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून सेलिब्रेशनची झलक दाखवली. पूजाचे कुटुंबीय आणि पती सिद्धेश चव्हाण यांच्यासोबत तिने पारंपरिक पोशाखात संक्रांत साजरी केली. पूजाची आई तिला ओवाळते आणि सिद्धेश आशीर्वाद घेतो. व्हिडीओत पूजाची बहीण रुचिरादेखील दिसते. पूजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.