प्राजक्ता माळी लग्नासाठी झाली तयार, आईला मुलं शोधण्यासाठी दिली परवानगी
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटात प्राजक्ता अभिनेता स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्रथमेश शिवलकर, रोहित माने, वनिता खरात यांच्यासह झळकणार आहे. प्रसाद खांडेकरने ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून २८ फेब्रुवारीला हा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने प्राजक्ता माळी ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. अशातच प्राजक्ताला एका शेतकरी मुलाने लग्नाची मागणी घातल्याचं समोर आलं आहे.