अभिनेत्री प्राजक्ता माळीचा नवोदित कवयित्री म्हणून सन्मान, पोस्ट करत म्हणाली, “हे दुर्मिळ…”
मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याची आघाडीची नायिका म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी. प्राजक्ताने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. प्राजक्ता माळी अभिनयाबरोबर उत्तम कवयित्री, नृत्यांगना, निवेदक व्यावसायिका आणि निर्माती आहे. अशा या हरहुन्नरी प्राजक्ता माळीला नुकताच नवोदित कवयित्री म्हणून ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा ‘सुनीताबाई स्मृती साहित्य पुरस्कार’ याने गौरविण्यात आलं. यासंदर्भात अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.