‘मी पडलोच नसतो तुझ्या फंदात…’, ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’चा ट्रेलर प्रदर्शित
अभिनेता पुष्कर जोगच्या ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. लग्नसंस्था आणि लैंगिक सुसंगतेवर भाष्य करणारा हा चित्रपट २१ मार्चला प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमध्ये पुष्कर, हेमल इंगळे आणि पूर्वी मुंदडा यांच्या भूमिकांमध्ये गुंतागुंतीचे प्रसंग दिसतात. चित्रपटात ॲमस्टरडॅम, पॅरिस आणि दुबईची सैरही आहे. दिग्दर्शक पुष्कर जोगने लग्नानंतरच्या जीवनातील भावनिक संवादाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.