मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
दिग्दर्शक सतीश राजवाडे 'प्रेमाची गोष्ट २' हा चित्रपट घेऊन येत आहेत. यापूर्वी त्यांनी 'मुंबई-पुणे-मुंबई' मालिकेतून प्रेमाच्या विविध छटा दाखवल्या होत्या. 'प्रेमाची गोष्ट २' मध्ये व्हीएफएक्स आणि प्रेमकथेचे अनोखे मिश्रण आहे. हा चित्रपट जून २०२५ मध्ये प्रदर्शित होईल. निर्माते संजय छाब्रिया आणि सहनिर्माते अमित भानुशाली आहेत. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे.