Video: राज ठाकरे अन् शर्मिला ठाकरेंनी घेतले अतुल परचुरेंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आज मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून अतुल परचुरे यांना श्रद्धांजली वाहिली. परचुरे यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.