‘नवरा माझा नवसाचा २’च्या कमाईत तिसऱ्या दिवशी मोठी वाढ, एकूण कलेक्शन ‘इतके’ कोटी
'नवरा माझा नवसाचा २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या दिवशी चांगली कमाई केली आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.८५ कोटी, दुसऱ्या दिवशी २.५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ३.८५ कोटी रुपयांची कमाई केली. तीन दिवसांत एकूण ८.२ कोटी रुपयांचे कलेक्शन झाले आहे. सचिन पिळगांवकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अशोक सराफ, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी यांसारखे दिग्गज कलाकार आहेत.