‘फुलवंती’ आणि ‘चंद्रा’ आमनेसामने; ‘या’ गाण्यावर प्राजक्ता माळी-अमृता खानविलकरचा डान्स
प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘फुलवंती’ चित्रपटाची जादू अजूनही बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे. ११ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या ‘फुलवंती’ चित्रपटाला नुकतेच ५० दिवस यशस्वीरित्या पूर्ण झाले. त्यानिमित्ताने १ डिसेंबरला सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी चित्रपटातील संपूर्ण टीमसह अभिनेत्री अमृता खानविलकरने विशेष हजेरी लावली होती. या पार्टीतील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.