प्रार्थना बेहेरेसह पूजा सावंत, भूषण प्रधानचा ‘बुम बुम बोंबला’ भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
नुकताच प्रार्थना बेहेरेने ‘बुम बुम बोंबला’ गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रार्थनासह अभिनेता पूजा सावंत, भूषण प्रधान, शाल्मली तोळ्ये, पूजा सावंतची बहीण रुचिरा सावंत, भाऊ श्रेयस सावंत पाहायला मिळत आहे. या सहा जणांनी ‘बुम बुम बोंबला’ या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. सर्वजण ‘बुम बुम बोंबला’ गाण्यातील हूकस्टेप करताना दिसत आहेत. प्रार्थनाने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही मिनिटांतच या व्हिडीओला ६० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.