खासदाराच्या मुलाने शेअर केला रिंकू राजगुरूबरोबरचा फोटो, कॅप्शन चर्चेत
'सैराट' फेम रिंकू राजगुरूचा मोठा चाहतावर्ग आहे आणि ती सोशल मीडियावर सक्रिय असते. भाजपा खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र कृष्णराज महाडिक यांनी रिंकूबरोबरचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा फोटो श्री महालक्ष्मी मंदिराबाहेरचा असून, सोशल मीडियावर चर्चेत आहे. नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. रिंकू 'राजर्षी शाहू महोत्सवा'साठी कोल्हापुरात गेली होती आणि अंबाबाई मंदिरात दर्शन घेतले होते.