‘राजा शिवाजी’च्या शूटिंगदरम्यान नदीत बुडालेल्या डान्सरचा मृतदेह २ दिवसांनी सापडला
अभिनेता रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान साताऱ्यात एक दुर्दैवी घटना घडली. मंगळवारी (२२ एप्रिल) रोजी शूटिंग संपल्यानंतर २६ वर्षीय डान्सर सौरभ शर्मा कृष्णा नदीत बुडाला. दोन दिवसांनंतर त्याचा मृतदेह सापडला. सौरभ हात धुण्यासाठी नदीत गेला होता, पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो वाहून गेला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.