सूरज चव्हाण ‘बिग बॉस मराठी’ जिंकल्याने ‘झापूक झुपूक’ सिनेमा आणला? रितेश देशमुख म्हणाला…
बारामती जवळच्या मोढवे गावातील 'बिग बॉस मराठी' विजेता सूरज चव्हाण केदार शिंदेंच्या 'झापुक झुपूक' चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. २५ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर लाँच कार्यक्रमात रितेश देशमुखने सूरजच्या कामगिरीचं कौतुक केलं. केदार शिंदे यांनी 'बिग बॉस'च्या दरम्यानच सूरजवर चित्रपट बनवण्याचं ठरवलं होतं. चित्रपटात जुई भागवत, इंद्रनील कामत यांच्यासह अनेक कलाकार आहेत.