“अतिशय भयंकर…”, शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली नाराजी; हात जोडून म्हणाले, “इच्छाच मेली..”
शरद पोंक्षे सध्या 'पुरुष' नाटकामुळे चर्चेत आहेत. बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील अस्वच्छतेबद्दल त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली. नाट्यगृहाची दुरवस्था, बाथरूमची भयाण अवस्था, एसी नसतानाही २१ हजार रुपये भाडं, प्रसाधनगृहांची कमतरता याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी बीडच्या नाट्यरसिकांना आणि अधिकाऱ्यांना नाट्यगृहाच्या सुधारणा करण्याची विनंती केली, अन्यथा बीडमध्ये पुन्हा नाटक सादर न करण्याचा इशारा दिला.