Video: शरद पोंक्षेंच्या मुलाचं दिग्दर्शनात पदार्पण, बंजाराचा टीझर प्रदर्शित
'बंजारा' हा मैत्री आणि आत्मशोधाचा अर्थ उलगडणारा मराठी चित्रपट १६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. सिक्कीमच्या निसर्गरम्य ठिकाणी चित्रीत झालेल्या या चित्रपटात शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. टीझरमध्ये तीन मित्रांची मोटरसायकल सफर दाखवली आहे. दिग्दर्शक स्नेह पोंक्षे यांनी मैत्री, प्रेम आणि आत्मशोधाचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.