“बळजबरीने भाषा अभिजात…”, सुबोध भावेने मांडले स्पष्ट मत
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने जबाबदारी वाढली असल्याचे मत 'मराठी भाषा अभिजात दर्जा व मराठी चित्रपट' या परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केले. सुबोध भावे, क्षितीज पटवर्धन आणि पंकज चव्हाण यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याची गरज व्यक्त केली. मराठी सिनेमाच्या कक्षा रुंदावण्याची आणि चांगल्या साहित्यकृतीवर चित्रपट निर्मितीची आवश्यकता असल्याचे पटवर्धन म्हणाले. शासनाने ७० कोटी रुपयांचे अनुदान दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले.