सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण, केदार शिंदेंनी व्हिडीओ केला शेअर
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण आता मराठी सिनेसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या ज्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे. ‘झापुक झपूक’ असं सूरजच्या नव्या चित्रपटाचं नाव असून केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. नुकताच केदार शिंदेंनी चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.