“तुझ्यासारखा भाऊ घरोघरी जन्म घ्यावा…”, आदर्श शिंदेसाठी उत्कर्षची खास पोस्ट
लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या शिंदेशाही घराण्याने आपल्या दमदार आवाजाने महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. शिंदेशाही घराण्याचा चाहता वर्ग महाराष्ट्रातच नव्हेतर देशभरात आहे. स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचा वारसा आज शिंदे घराण्याची चौथी पिढी जिवंत ठेवून आहे. मराठी सिनेसृष्टीत शिंदेशाहीचं उल्लेखनीय आणि वाखण्याजोग योगदान आहे. आज शिंदे घराण्यातील प्रसिद्ध गायक आदर्श शिंदेचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आदर्शचा भाऊ उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.