Zapuk Zupuk: सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ने ३ दिवसांत कमावले फक्त ‘इतके’ लाख
'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी रिलीज झाला. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाची ओपनिंग संथ झाली. पहिल्या दिवशी २४ लाख, दुसऱ्या दिवशी २४ लाख, आणि तिसऱ्या दिवशी १९ लाख रुपये कलेक्शन झाले. तीन दिवसांत एकूण ६७ लाख रुपये कमाई झाली. 'झापुक झुपूक'च्या टीमने अधिकृत आकडेवारी अद्याप शेअर केलेली नाही.