ट्रेडिंगसाठी काळा दिवस! डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्कामुळे शेअर बाजारात मोठी घसरण
अमेरिकेने भारतावर आयात शुल्क लावल्यानंतर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स ०.२ टक्क्यांनी कमी झाले. अमेरिकन निर्देशांकांनीही मोठा तोटा नोंदवला आहे. सेन्सेक्स ०.४५ टक्क्यांनी घसरून ७५,९५४.९६ वर आणि निफ्टी ०.३५ टक्क्यांनी घसरून २३,१६९.८० वर उघडले. आयटी क्षेत्रात मोठी घसरण झाली असून औषध क्षेत्रातील शेअर्स वाढले आहेत.