व्हिडीओ कॉलवर महिलेला विवस्त्र होण्यास सांगितले; मग पैसे उकळले, अशी होते सायबर फसवणूक
सायबर घोटाळ्यांबाबत रोज नवनवीन बातम्या येत असतानाही लोक सायबर फसवणुकीला बळी पडत आहेत. मुंबईतील ३६ वर्षीय महिला वकिलाला एका कॉलद्वारे फसवले गेले. तिला पवई येथील हॉटेलमध्ये बोलावून नग्न फोटो आणि व्हिडीओ मिळवले. तिच्या खात्यातून ५० हजार रुपये चोरट्यांनी वळवले. पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत.