सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट स्कॅम; मुंबईतल्या ८६ वर्षीय महिलेची २० कोटींची फसवणूक
डिजिटल अरेस्ट स्कॅमद्वारे सायबर चोरट्यांनी देशभरात हजारो लोकांची कोट्यवधीची फसवणूक केली आहे. मुंबईतील ८६ वर्षीय महिला या घोटाळ्याला बळी पडली असून २०.२५ कोटींची फसवणूक झाली आहे. आरोपींनी पोलीस अधिकारी असल्याचे भासवून महिलेला फोन केला आणि तिच्या खात्यातील पैसे विविध बँक खात्यात वळवले. मुंबई क्राइम ब्रँचने दोन आरोपींना अटक केली असून आणखी एक आरोपी फरार आहे.