संजय राऊतांच्या घराची रेकी; दोन अज्ञात बाईकस्वार CCTV मध्ये कैद, दिल्लीतील घरावरही…
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या घराची रेकी झाल्याचा दावा संजय राऊत व त्यांच्या बंधू सुनील राऊत यांनी केला आहे. सुनील राऊत यांनी सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना दिले असून त्यात दोन बाईकस्वार दिसत आहेत. संजय राऊत यांनी सांगितले की, त्यांच्या मुंबई आणि दिल्लीतील घरांची रेकी होत आहे. सुनील राऊत यांनी पोलिसांना कळवले असून तपास सुरू आहे.