“महिलेचा फोटो, ब्लॅकमेलिंग आणि…” तुतारी एक्स्प्रेसमधील सूटकेस हत्या प्रकरणी नवा अँगल समोर
मुंबई सूटकेस हत्याकांड प्रकरणात दोन मूक बधिर आरोपींना मुंबई पोलिसांनी चार तासांत अटक केली. दादर रेल्वे स्थानकावर संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी त्यांची बॅग तपासली असता, त्यात रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. मृतदेह अर्शद अली शेखचा होता. आरोपींनी अर्शदला पार्टीसाठी बोलावून मद्यपानानंतर हत्या केली. प्रेमप्रकरण आणि ब्लॅकमेलिंगमुळे वाद होऊन हत्या झाली असा नवा अँगल समोर आला आहे.